Loksabha 2019 : अंगणवाडी सेविकांना निवडणूक काम ऐच्छिक 

Loksabha 2019 :  अंगणवाडी सेविकांना निवडणूक काम ऐच्छिक 

मुंबई - राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी निवडणुकीचे काम ऐच्छिक असेल. या कामावर आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी (ता. 24) उच्च न्यायालयात दिली. 

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने ऍड्‌. क्रांती सिंह यांनी केलेल्या याचिकेवर बुधवारी न्या. अभय ओक आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अंगणवाडी सेविकांना मतदानाच्या आदल्या दिवशी प्रशिक्षण दिले जाईल आणि मतदानाच्या दिवशी काम करावे लागेल. त्यासाठी त्यांना दिवसाला 250 रुपये मानधन दिले जाईल. मतदानाच्या दिवशी 250 रुपये मानधन आणि जेवणाची व्यवस्था केली जाईल. जेवण न घेतल्यास 150 रुपये भत्ता दिला जाईल, असे निवडणूक आयोगाच्या वतीने ऍड्‌. प्रदीप राजागोपाल यांनी सांगितले. खंडपीठाने त्यांचे म्हणणे नोंदवून घेतले आणि याचिका निकाली काढली. 

निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात दिलेल्या हमीमुळे नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील सुमारे 3700 अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोग आणि याचिकादार यांच्यात न्यायालयाबाहेरही चर्चा झाली. देशहिताच्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांनी निवडणुकीचे काम करावे, असे सुचवण्यात आले. नियमानुसार विशिष्ट काम असलेल्यांना निवडणूक आयोगाचे काम लागू शकत नाही. या अंगणवाडी सेविकांनी निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्यापैकी काही जणींना हे काम करण्याची इच्छा आहे, असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com