नाना पटोले म्हणजे महाराष्ट्राचे नवज्योसिंग सिद्धू; बोंडेचा पुन्हा हल्लाबोल

जसे सिद्धूला दिवसा तारे दिसत होते, तसे नानांना दिवसा चांदणे दिसतात - अनिल बोंडे
Political News
Political Newsesakal
Summary

जसे सिद्धूला दिवसा तारे दिसत होते, तसे नानांना दिवसा चांदणे दिसतात - अनिल बोंडे

देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांत भाजपाने जोरदार मुंसडी मारली आहे. चार राज्यात भाजपाने झेंडा रोवला असून पंजाबमध्ये (Punjab Election 2022) मात्र आमआदमी पार्टीला विजय मिळवला आहे. दरम्यान, या पाच राज्यांत कॉंग्रेस मात्र बॅकफुटवर पडला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आत्मचिंतनाची आश्यकता असल्याचे बोलले जातं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठे भाकीत केलं. पुढील लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस जिंकेल आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री काँग्रेसचाच (Congress) असेल, असे पटोलेंनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपाकडून टीका होत आहे.

Political News
'सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला'; द काश्मिर फाइल्सवर PM मोदींची प्रतिक्रिया

यासंदर्भात भाजपाचे अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणतात, नाना पटोले म्हणजे पंजाबमधील नवजोत सिंह सिद्धू यांची महाराष्ट्रीयन कॉपी आहेत. जसे सिद्धूला दिवसा तारे दिसत होते तसे नानांना दिवसा चांदणे दिसत आहे, अशी खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला अपयश आले आहे. यावरून पक्षात मोठा गदारोळ सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक याबाबत आत्मपरीक्षण करण्यासाठी बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पक्षातील नेत्यांनी याला आक्षेप घेत गांधी कुटुंबानेच नेतृत्व करावे, अशी एकमुखी भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या कामगिरीवरून इतर लक्ष्य करीत आहेत. याचवेळी काँग्रेस नेते आक्रमक पवित्रा घेऊ लागले आहेत. आता बोंडे यांच्या या विधानावर नाना पटोले काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Political News
सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापराला बंदी - मद्रास HC

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com