esakal | राज्यात तीन हजार पोलिस कोरोनामुक्त; ‘एवढ्या’जणांना झाला कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh informed that 3000 police have been corona virus released in state

जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या चार हजार ४८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील तीन हजार पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४६ पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राज्यात तीन हजार पोलिस कोरोनामुक्त; ‘एवढ्या’जणांना झाला कोरोना

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या चार हजार ४८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील तीन हजार पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४६ पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : गृहमंत्र्यांनी शब्द पाळला ! कोरोनाबाधित मृत पोलिसांच्या कुटुंबांना दिली एवढी मदत
महाराष्ट्रात पुण्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत गेली. २० जूनपर्यंत एक लाख २८ हजार २०५ कोरोबाबाधित रुग्णांची संख्या झाली. त्यातील ६४ हजार १५३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर ५८ हजार ५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी राज्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हापासून सरकार ‘कोरोनाला घाबरु नका, घरात बसा, बाहेर पडू नका’ असे नागरिकांना आवाहन करत आहे. मात्र पोलिस नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर होते.

कोरोनाला रोखण्यासाठी टप्याटप्याने निर्णय घेण्यात आले. विमानसेवा, रेल्वे वाहतूक, एसटी वाहतूक बंद करत जिल्ह्याच्या सिमाही सील करण्यात आल्या होत्या. त्यातून फक्त अत्यावश्‍यक सेवांना वगळण्यात आले होते. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणत काही उद्योग धंदे व वाहतूकींना सवलत देण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना रोखण्यासाठी डॉक्टर, पोलिसांसह अत्यावश्‍यक सेवेत येणारे घटक रस्त्यावर उतरले.
हेही वाचा : बापरे! कोरोना लॉकडाऊन दरम्यान राज्यात ‘ऐवढे’ गुन्हे...
कोरोनाचा प्रादुर्भव वाढू नये म्हणून सरकारच्या सूचनेनूसार पोलिसांकडून अंमलबाजावणी केली जात होती. जिल्हा सीम बंद करण्यात आल्या तेव्हा जीवाची परवा न करता पोलिस जिल्ह्यांच्या सीमेवर गेले. काही ठिकाणी तर जिल्ह्यांच्या सिमांवरती सुविधाही नव्हत्या, अशा ठिकाणी पोलिसबांधवांना रहावे लागले. कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यानंतर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले.
लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात १२ एफ्रिलपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. त्यानंतर पहिला रुग्ण सापडला. मृत्यू झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर सोलापूरकरांनी खरा कोरोनाचा धसका घेतला. प्रशासनाने वेळोवेळी योग्य ती खबरदारी घेतली तरी काही भागातील नागरिक बाहेर पडून गर्दी करत होते. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस जिव धोक्यात घालून उतरत होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला. तरीही न घाबरता पोलिस कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरले. अशीच कमी जास्त प्रमाणात राज्यात स्थिती होती. त्यात चार हजार ४८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतरही पोलिसांनी हार मानली नाही. नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी ते तत्पर राहिले. कोरोनातून तीन हजार पोलिस बरे झाले आहेत. तर ४६ पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्‌वारे दिली आहे.
१५ जूनपर्यंत मुंबई २६, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ३, एटीएस १,  मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १, पालघर १ अशा पोलिसांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सहा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

loading image