अनिल देशमुखांकडून मंत्रीपदाचा राजीनामा; चंद्रकांत पाटील यांच्याकडून समाधान व्यक्त

chandrakant patil.
chandrakant patil.

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांच्या आत अनिल देशमुखांवरील आरोपांची प्राथमिक चौकशी सुरु करण्याचे निर्देश दिलेत. आधी या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु होते. पण आता थेट न्यायव्यवस्थेने गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश देणे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे अनिल देशमुख गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती आणि त्यानुसार, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. 

याबाबत आता पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली भुमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलंय की, जे जे चुकेल त्याला शासन आहे. त्याशिवाय लोकशाही सुदृढ होणार नाही. हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा मनात एक शंका होती.  पवारसाहेबांच्या घरी मिटींग तर धनंजय मुंडेच्या वेळीही सहा तास झालेली. मात्र अंतिमत: निर्णय असा झाला की धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत. परमवीर सिंगांनी अनिल देशमुखांवर जेंव्हा आरोप केला तेंव्हा देखील मिंटीग झाली मात्र राजीनामा झाला नाही. मी खूप समाधान व्यक्त करतो की पवार साहेबांनी संवेदनशीलतेने हा निर्णय घेतला. सीबीआय चौकशी लागू झाल्यावर पदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला, याबाबत मी समाधान व्यक्त करतो. 

सचिन वाझे यांच्या मार्फत महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केला होता. पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप झाल्यामुळं अखेर सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही त्यांनी हा विषय लावून धरला होता. अखेर देशमुखांच्या राजीनाम्याची वेळ सरकारवर आल्याने आघाडी सरकारवर नामुष्की ओढवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com