esakal | 'अनिल परबांचे वांद्रेतील अनधिकृत कार्यालय पाडणार'; सोमय्यांनी दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

'अनिल परबांचे वांद्रेतील अनधिकृत कार्यालय पाडणार'

आता पुन्हा एकदा अनिल परब वापरत असलेले म्हाडा, वांद्रे पूर्व येथील अनधिकृत कार्यालय पाडण्यात येणार असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

'अनिल परबांचे वांद्रेतील अनधिकृत कार्यालय पाडणार'

sakal_logo
By
स्नेहल कदम

रत्नागिरी - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या कोकणातील रिसॉर्ट संदर्भात विरोधकांकडून त्यांच्यावर टीका सुरु आहे. गेले काही दिवसांपासून या प्रकरणाविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. आता पुन्हा एकदा अनिल परब वापरत असलेले म्हाडा, वांद्रे पूर्व येथील अनधिकृत कार्यालय पाडण्यात येणार असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एन. कानडे यांनी भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Samayya) यांचा याचिकेच्या सुनावणी दरम्यान हा आदेश दिला आहे. सोमय्या यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. दरम्यान म्हाडाने जून आणि जुलै 2019 मध्ये अनिल परब यांना नोटीस बजावली होती. (Political News)

हेही वाचा: ठरलं! भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री

गेले काही दिवस अनिल परब यांचे कोकणातील रिसॉर्ट अनिधीकृत आहे असे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. मुरुड (ता. दापोली) येथील साई रिसोर्टबाबत (sai resort) भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लेखी तक्रार जिल्हाधिका-यांकडे केली होती. सीआरझेड कायद्याचे (law of CRZ) उल्लंघन केले आहे, फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पदाचा दुरुपयोग केला तसेच अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. असे मुद्दे सोमय्या यांनी मांडले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अकरा मंत्र्यांची भांडाफोड करणार असल्याचेही सोमय्या यांनी सुचित केले आहे. येत्या काही दिवसांत या मंत्र्याचे घोटाळे बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: राज्यात ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना अ‌ॅलर्ट जारी

दरम्यान अनिल परब यांना ईडीची नोटीस आली होती. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलिस दलातील बदल्या करत होते, असं सांगितल्याची माहिती मिळाली होती. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अनिल परब यांनी सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी एक पत्र लिहून केला होता.

loading image
go to top