लोकपालच्या अंमलबजावणीस सरकारला भाग पाडू - हजारे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

राळेगणसिद्धी - लोकपाल कायद्यासाठी प्रथम दिल्लीत व नंतर राळेगणसिद्धीत आंदोलन केल्यावर कायदा अस्तित्वात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीत आंदोलन झाले होते. आता राळेगणसिद्धीत आंदोलन करून कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी "सकाळ'शी बोलताना दिला. 

हजारे येत्या दोन ऑक्‍टोबरपासून लोकपाल व लोकायुक्ताच्या अंमलबजावणीसाठी राळेगणसिद्धी येथे उपोषणास बसणार आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. 

हजारे म्हणाले, ""लोकसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलन होत असल्याने सरकारला निर्णय घ्यावाच लागेल. लोकपाल कायदा अस्तित्वात आल्यास देशात खऱ्या अर्थाने लोकशाही येईल. या कायद्यानुसार सामान्य नागरिकही पंतप्रधानांच्या विरोधात पुराव्यासह लोकपालांकडे तक्रार करू शकेल. लोकपाल व लोकायुक्त कायदा कोणत्याच राजकीय नेत्याला नको आहे. कारण, त्यांच्यासाठी तो त्रासदायक ठरणारा आहे. यापूर्वी आघाडी सरकारनेही तो केला नाही आणि आता आश्वासन देऊनही भाजप सरकार करीत नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही.'' 

लोकपालच्या नेमणुकीसाठी असलेल्या समितीत विरोधी पक्षनेता असतो. कॉंग्रेस हा लोकसभेतील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे निमंत्रण देऊनही बैठकीस जात नाहीत. याचा अर्थ विरोधी पक्षांना लोकपाल कायदा नकोच आहे. 
अण्णा हजारे, समाजसेवक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anna hazare Lokpal to implement issue