अण्णांचे गांधी जयंतीपासून आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 जुलै 2018

राळेगणसिद्धी - स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, शेतीमाल ठेवण्यासाठी शीतगृहे उभारावीत, वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, तसेच केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्ताची नेमणूक करावी या आणि इतर मागण्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज तिसरे स्मरणपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले. याबाबत ठोस कारवाई न झाल्यास दोन ऑक्‍टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांना पाठविलेल्या या पत्राच्या प्रती पंतप्रधान, तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविल्या आहेत. अण्णांनी या पत्रात म्हटले आहे, की सत्तेवर आल्यावर लोकपाल व लोकायुक्त कायदा तत्काळ अमलात आणू व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीही लागू करू, अशी आश्‍वासने आपण निवडणूक काळात जनतेला दिली होती. मात्र सत्तेवर येऊन चार वर्षे लोटली, तरीही काहीच कारवाई झाली नाही. 

Web Title: Anna Hazare movement from Gandhi Jayanti