राज्याचे स्टार्ट-अप धोरण जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

मुंबई : राज्यात विकासाला चालना देत रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य सरकारने नावीन्यपूर्ण संकल्पानावर अधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्ट-अप धोरण-2018 जाहीर केले. या धोरणाची अंमलबजावणी करताना नावीन्यपूर्ण उत्पादनाचे प्रदर्शन करण्यासाठी "स्टार्ट-अप आठवड्या'चे नियोजन करण्यात येणार असून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात "स्टार्ट-अप आठवडा' साजरा करण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारने नवीन व नावीन्यपूर्ण उद्योग सुरू करणाऱ्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट-अप धोरण जाहीर केले आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यानेही स्टार्ट-अप धोरणास गती दिली. यानुसार स्टार्ट-अप धोरणाखाली सुरू झालेल्या उद्योग-व्यावसायातील उत्पादनाचे प्रदर्शन, विक्री आदींसाठी "स्टार्ट-अप आठवडा' साजरा करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. यानुसार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा आठवडा साजरा करण्यात येणार आहे. 

Web Title: Announced the state's start-up strategy