राज्यातील 3 शहरांत नक्षलवादविरोधी कक्ष 

राज्यातील 3 शहरांत नक्षलवादविरोधी कक्ष 

मुंबई - नक्षलवादाची बीजे शहरी भागांतही रुजत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) धर्तीवर राज्यात नक्षलवादविरोधी कक्ष सुरू करण्याचा गृह विभागाचा विचार आहे. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे हे कक्ष स्थापन करण्यात येण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दुर्गम भागांतील नक्षलवाद शहरी भागातही पसरत असल्याचे उघड होत आहे. महाराष्ट्र "एटीएस'च्या पथकाने काही महिन्यांपूर्वी मुंबई परिसरातून काही संशयित नक्षलवाद्यांना अटक केली होती. ते सांकेतिक शब्दांचा वापर करत असल्याचे तपासात उघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर शहरी भागांत फोफावू पाहणाऱ्या नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांत हे कक्ष सुरू करण्याचा गृह विभागाचा विचार आहे. 

गडचिरोलीसारख्या भागांत नक्षलवाद्यांशी दोन हात करताना पोलिसांना सावधगिरी बाळगावी लागते. तेथे "आयईडी' स्फोटके आणि भूसुरुंगांचा धोका असतो. या पार्श्‍वभूमीवर गृह विभागाने लष्कराच्या जबलपूर येथील कारखान्यात तयार केलेली विशेष वाहने खरेदी केली आहेत. घनदाट जंगलात नजर ठेवण्यासाठी उच्च क्षमतेच्या ड्रोनचा वापर होत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. 

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत नक्षलवादाची समस्या तीव्र आहे. तेथे पोलिस संयुक्त कारवाई करत असतात. तेथे "ट्राय जंक्‍शन'ला नवीन कक्ष तयार करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागातर्फे दोन्ही राज्यांना पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गडचिरोलीत पोलिसांची दोन केंद्रे 
गडचिरोलीतील नागरिकांना सुरक्षित वाटावे, तेथे पोलिसांची ताकद वाढावी, या उद्देशाने तेथे पोलिसांची आणखी दोन केंद्रे स्थापन करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. तीन वर्षांत ती अस्तित्वात येतील. या केंद्रात प्रत्येकी शंभर पोलिस असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सकारात्मक चित्र 
- गडचिरोलीत सहा महिन्यांत आठ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण. 
- नक्षलग्रस्त भागात काम करण्यासाठी इच्छुक पोलिसांच्या संख्येत वाढ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com