#MeToo ‘इंडियन आयडॉल’मधून अन्नू मलिक बाहेर

#MeToo ‘इंडियन आयडॉल’मधून अन्नू मलिक बाहेर

मुंबई - संगीतकार अन्नु मलिक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आरोपांची तीव्रता पाहता एका वाहिनीने त्यांना इंडियन आयडॉल-१० च्या परीक्षक समितीवरून हटवले आहे. मात्र अन्नू मलिक यांनी स्वत:हून पद सोडले असल्याचेही अन्य वृत्तांत म्हटले आहे. ते येत्या सोमवारपासून या संगीत रिॲलिटी शोच्या भागाच्या चित्रिकरणात सहभाग घेणार नाहीत, असे सांगण्यात आले. 

अलीकडेच अन्नू मलिकवर सोना महापात्रा यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर श्‍वेता पंडित यांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याशिवाय आणखी काही गायिकांनी  लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. अर्थात हे सर्व आरोप अन्नू  मलिक यांनी फेटाळून लावले होते. भारतातील #MeToo अभियान हे आपल्या पक्षकाराचे चारित्र्य हनन करण्यासाठी राबवले जात असल्याचे मलिक यांच्या वकिलाने म्हटले होते. त्याचवेळी प्रसिद्ध गीतकार समीर अनजान यांनी मलिक यांचा बचाव केला आहे. श्‍वेता पंडित यांनी ज्या घटनेचा उल्लेख केला आहे, त्या वेळी आपण तेथे हजर होतो. असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समीर अनजान यांनी म्हटले आहे. 

२००४ पासून इंडियन ऑयडॉलशी निगडित असलेले अन्नु मलिक यांनी हा कार्यक्रम सोडत असल्याचे सांगत सध्याची स्थितीत आपण कामावर लक्ष देऊ शकत नाही, असे म्हटले आहे. यासंदर्भात वाहिनीने आपली विनंती मान्य केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वाहिनी प्रशासनाने मलिक यांना परीक्षक समितीचे पद सोडण्यास सांगितल्याचा दावा केला आहे. 

केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा
अनैसर्गिक लैंगिक शोषणाच्या आरोपावरून केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याविरुद्ध केरळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण पाच वर्षांपूर्वीचे असून एका महिलेने त्यांच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याचा दावा केला आहे. व्यवसायाला फायदा मिळवून देण्याच्या आमिष दाखवून चंडी यांनी अत्याचार केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. तिरुअनंतपुरम येथील सरकारी निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com