
ओटीटीवर सर्जनशीलतेच्या नावाखाली, शिवीगाळ आणि असभ्यपणा सहन केला जाणार नाही; अनुराग ठाकूर
ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्याविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल. सर्जनशीलतेच्या नावाखाली, असभ्य शिवीगाळ स्वीकारली जाणार नाही. यावर काही कारवाई करण्याची गरज पडली तर सरकार मागे हटणार नाही” असा इशारा अनुराग ठाकूर यावेळी दिला.
गेल्या काही काळापासून, या तक्रारी वाढण्यास सुरुवात झाली आहे. अत्यंत गांभीर्याने त्याकडे आमचा विभाग बघतो आहे.या नियमावलीत बदल करण्यासंदर्भात आम्ही गांभीर्याने विचार करतो आहोत असेही अनुराग ठाकूर म्हणाले.