पाण्यावरून कोणीही राजकारण करू नका - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

ठाकरे म्हणाले, की माणूस अनेक गोष्टी बनवू शकतो. मात्र, त्याला अद्याप पाण्याची निर्मिती करता आलेली नाही. म्हणूनच, शिल्लक असलेल्या पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. जिथे दुष्काळ आहे; तिथे सरकार योजना राबवीत आहे. त्यामुळे पाण्यावरून कोणीही राजकारण करू नये.  

राजकारण नाही - मुनगंटीवार
राज्य सरकार जलयुक्त शिवार आणि जल साक्षरता अभियान राबवीत असून, निधी मंजूर केला आहे. ठिबक सिंचन योजनेचा विस्तार करून राज्य सरकार पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करीत आहे, असे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज्य सरकार पाण्याचे राजकारण कधीच करणार नाही. पाणी म्हणजे जीवन आहे आणि जीवनाचे राजकारण कधीही होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anyone dont politics on water Uddhav Thackeray