कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या  - दिलीप कांबळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पुणे - ""लातूर येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यावरून वादंग निर्माण झाला. हे अनवधानाने केलेले वक्तव्य मागे घेतो; माझा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता,'' असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज स्पष्ट केले. 

नवीन शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कांबळे म्हणाले, ""लातूरच्या कार्यक्रमात भाषण करताना, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार रमेश कदम यांनी महामंडळात गैरव्यवहार केल्यामुळे ते सध्या तुरुंगात आहेत; तसेच न्यायालयाने कदम यांची 135 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, असे मी सांगत असताना कदम यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात गोंधळ केल्याचे समजले. त्या वेळी आमची लढाई ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, असे मी म्हटले होते. मात्र, त्यानंतरचे वाक्‍य मी अनवधानाने बोलून गेलो. यामुळे कोणत्या समाजाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता.'' 

कांबळे यांच्या विधानामुळे सोमवारी दिवसभर सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवर जोरदार चर्चा सुरू होती. अखेर सोमवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत खुलासा केला. माझ्या विधानाने एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. माझ्या वाक्‍याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. तसेच, आता सार्वजनिक ठिकाणी बोलताना खूपच काळजी घेण्याची गरज असल्याची मला जाणीव झाली आहे. माझ्या वक्‍तव्याचे कोणीही भांडवल करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. 

Web Title: Anyone's feelings were not a virtue