esakal | चार घटकांवर नुकसानीचा अहवाल ! मृतांच्या नातेवाईकांसह नुकसानग्रस्तांना 'अशी' मिळणार भरपाई
sakal

बोलून बातमी शोधा

3Mohol_20Survey1.jpg

2015 मधील निर्णयानुसार मिळणार भरपाई

 • दुधाळ जनावरे : 30,000
 • मेंढी, बकरी, डूक्‍कर : 3,000
 • उंट, घोडा, बैल : 25,000
 • वासरु, गाढव, शिंगरू, खोचर : 16,000
 • कुक्‍कूटपालन : प्रतिकोंबडी 50 रुपये
 • सखल भागातील पक्‍के घर पूर्णत: पडझड : 95,100
 • दुर्गम भागातील घर पडझड : 1,01,900
 • व्यक्‍ती मृत : प्रत्येकी चार लाख
 • पक्‍की घरे 15 टक्‍के पडझड : 5,200
 • कच्चे घर 15 टक्‍के पडझड : 3,200
 • पडझड तथा नष्ट झोपड्या : 4,100
 • घराला जोडून असलेला गोठा : 2,100

चार घटकांवर नुकसानीचा अहवाल ! मृतांच्या नातेवाईकांसह नुकसानग्रस्तांना 'अशी' मिळणार भरपाई

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : परतीच्या पावसाने उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतीला सर्वाधिक फटका बसला. तर सोलापूर जिल्ह्यातील 21 व्यक्‍तींच्या मृत्यूसह अन्य जिल्ह्यातील काहीजणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हजारांहून अधिक लहान- मोठ्या जनावरे दगावली असून घरांची पडझड तथा घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानुसार शेती, व्यक्‍तीचा मृत्यू, जनावरांचा मृत्यू आणि घरांची पडझड या चार बाबींवर आधारित पंचनामा अहवाल पाठवावा, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार आता मंगळवारपर्यंत अहवाल शासनाला सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर मदतीची रक्‍कम संबंधित जिल्ह्यांना वितरीत केली जाणार आहे.

राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्तेही खराब झाले आहेत. त्याची तात्पुरती डागडूजी केली जाणार असून दुसरीकडे 13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीने दगावलेल्या व्यक्‍तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची तर कोंबड्या, दुभती जनावरे, बैल, मेंढी, बकरी, शेळ्या, वासरु, उंड, घोटा, वासरु, गाढव, शिंगरू, खोचर, डूक्‍कर मृत झालेल्यांसाठीही मदत मिळणार आहे. तर पक्‍क्‍या व कच्च्या घरांची पूर्णत: पडझड, 15 टक्‍के पडझड, झोपड्या, गोठ्यांचे नुकसान झालेल्यांनाही भरपाई वितरीत केली जाणार आहे. जिल्हास्तरावरुन चार घटकांवर पंचनामे अहवाल शासनाने मागविल्याने तत्काळ मदत करणे शक्‍य होणार आहे. पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हानिहाय मदतीची रक्‍कम निश्‍चित करुन ती काही दिवसांत वितरीत केली जाणार आहे.


मंगळवारपर्यंत जाईल नुकसानीचा अहवाल
जिल्ह्यातील पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार पावणेदोन लाख हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तर 21 व्यक्‍तींसह जनावरे व घरांचीही पडझड झाली आहे. नुकसानग्रस्तांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार मदत दिली जाणार आहे. तर शेतीच्या भरपाईसाठी शासनाने आता नवे निकष तयार केले असून त्यानुसार भरपाई मिळेल. 
- अजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

2015 मधील निर्णयानुसार मिळणार भरपाई

 • दुधाळ जनावरे : 30,000
 • मेंढी, बकरी, डूक्‍कर : 3,000
 • उंट, घोडा, बैल : 25,000
 • वासरु, गाढव, शिंगरू, खोचर : 16,000
 • कुक्‍कूटपालन : प्रतिकोंबडी 50 रुपये
 • सखल भागातील पक्‍के घर पूर्णत: पडझड : 95,100
 • दुर्गम भागातील घर पडझड : 1,01,900
 • व्यक्‍ती मृत : प्रत्येकी चार लाख
 • पक्‍की घरे 15 टक्‍के पडझड : 5,200
 • कच्चे घर 15 टक्‍के पडझड : 3,200
 • पडझड तथा नष्ट झोपड्या : 4,100
 • घराला जोडून असलेला गोठा : 2,100