शेतकऱ्यांचे दुःख मला माहिती : दानवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

शेतकऱ्यांचे दुःख मला माहिती आहे. मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही. कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये. शेतकऱ्यांची बाजू घेत 35 वर्षे राजकारण केले.

जालना - शेतकऱ्यांबद्दल असभ्य भाषा वापरणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत शेतकऱ्यांचे दुःख मला माहिती असल्याचे म्हटले आहे.

आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त तूर आपल्या सरकारने खरेदी केली, अजून एक लाख टन तूर खरेदी करणार आहे तरी रडतात साले, अशी असभ्य भाषा रावसाहबे दानवे यांनी वापरली होती. यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, विरोधी पक्षांकडून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दानवेंविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अखेर आपण केलेल्या वक्तव्यावर दानवेंना उपरती झाली असून, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

दानवे म्हणाले, की शेतकऱ्यांचे दुःख मला माहिती आहे. मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही. कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये. शेतकऱ्यांची बाजू घेत 35 वर्षे राजकारण केले. शेतकऱ्यांची मने दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.

Web Title: apology by Raosaheb Danve on controversial statement