लोककला पथकांच्या अनुदानाला मंजुरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई  - यात्रा-जत्रा आणि सांस्कृतिक मेळाव्याचा हंगाम संपता-संपता तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याच्या सांस्कृतिक कार्य खात्याने 26 लोककला पथकांना प्रयोग अनुदानासाठी 48 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. परंतु अद्यापही या कलावंतांना हातात अनुदान पडले नाही. 

दिवाळीनंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांत यात्रा, सांस्कृतिक मेळावे याला सुरवात होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील तमाशा फड मालकांच्या गाड्या दिवाळीनंतर बाहेर पडतात, त्या थेट एप्रिल महिनाअखेरीस घरी येतात. या काळातच खऱ्या अर्थाने या तमाशा कलावंतांना सरकारी अनुदानाची गरज असते. त्यासाठी हे कलावंत जून-जुलैनंतर अनुदानासाठी अर्ज करीत असतात. परंतु सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी गेले काही वर्षांपासून एक किंवा दोन बैठक घेऊन अनुदानाला मंजुरी देतात. यामुळे कला पथकांना वेळेवर अनुदान मिळत नाही. सरते शेवटी सावकारी कर्ज काढल्याशिवाय या कलावंतांना पर्याय नसतो. 

सांस्कृतिक कार्य खात्याने 2017-18 या आर्थिक वर्षात 26 कला पथकांना 48 लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. परंतु हे अनुदान अजून त्यांच्या हातात पडले नाही. एप्रिलअखेरपर्यंत या अनुदानाचे धनादेश मिळण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे विदर्भातील ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असलेल्या खडी गंमत या लोककला पथकाचा एकही प्रस्ताव या शासन निर्णयात दिसत नाही.

Web Title: Approval of grant of folk art teams