राज्यातील ५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता; गिरीश महाजन

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
Girish Mahajan
Girish Mahajanesakal

मुंबई : राज्यातील निवडक ५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

या बाबतीत १८ जानेवारी २०२३ रोजी बैठक पार पडली होती. या अनुषंगाने सदर बैठकीत या बाबतीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सदर ५० गावाच्या प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने ग्राम विकास विभागाच्या वतीने दि.24 मे रोजी याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले असून,

यामध्ये जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, आदी जिल्ह्यांतील गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती ही या वेळी श्री.महाजन यांनी दिली.

Girish Mahajan
Mumbai Crime : शिक्षिकेचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी; शाळेतील कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दखल

सभागृह बांधण्यात येणारी गावे पुढीलप्रमाणे आहेत. पहूरपेठ, वाकोद, पहुरकसबे, ता.जामनेर, लोहारा, कुऱ्हाड, ता.पाचोरा, म्हसावद, ता.जळगाव, अहिरवाडी, ता.रावेर, शिरसाला, ता.बोदवड, चहार्डी, ता.चोपडा, पाळधी, ता.धरणगाव, निमगाव घाना, ता,अहमदनगर, मोहरी, ता.पाथर्डी, आस्तेगाव, ता.राहता,

मुकिंदपूर, ता.नेवासा, पट्टनकोडोली, ता.हातकंणगले, अदमापूर, ता.भुदरगड (गारगोटी), वाशी, ता.करवीर, घाणेवाडी, ता.जालना, टेंभुर्णी, ता.जाफराबाद, चिंचोली निपाणी, ता.भोकरदन, आनंदगाव, ता.परतुर, म्हसावद, ता.शहादा, नागरे, ता.पुरंदर, जाडकरवाडी, ता.आंबेगाव, माळेगांव, रीसनगांव, ता.लोहा, शेळगाव (छत्री),

Girish Mahajan
Mumbai : मुंबई शहरात गेल्या 24 तासांत पोलिसांवर हल्ल्याच्या तीन घटना,चौघांना अटक

ता.नायगाव (खै), वझरगा, ता.देगलूर, नरसी, ता.नायगांव, पोफळी, ता.उमरखेड, मंगलादेवी, ता.नेर, चिखलगाव, ता.वणी, धनगरवाडी, ता.दारव्हा, मारवाडी बु. ता.पुसद, भरणे, ता.खेड, कांबळेश्वर, ता.फलटण, टाकेवाडी, ता.माण,

वाठार स्टेशन, ता.कोरेगाव, तरंदल (धनगरवाडी), ता.कणकवली, खेडी, ता.सावली, बेम्बाळ, ता.मूल, थुतरा, ता.कोरपना, तेमुर्डा, ता.वरोरा, भंगाराम तळोधी, ता.गोडपिंपरी, नवरगाव, ता.सिंदेवाही, वाठोडा शुक्लेश्वर, ता.भातकुली, घोराड, ता.कळमेश्वर, रोहणा- इंदरवाडा, ता.नरखेड, बेला, ता.उमरेड, केळवद, ता.सावनेर यामध्ये प्रामुख्याने वरील प्रमाणे ५० गावांचा समावेश आहे.

Girish Mahajan
Pune Crime : पोलिसांनी दोन तास सिने स्टाईलने पाठलाग करून डिझेल चोरांना नागरिकांच्या मदतीने पकडले

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्या वतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात देण्यात येणार असून, सर्व सोयी- सुविधायुक्त सुसज्ज असे ५० सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत.

या माध्यमातून धनगर तसेच भटके विमुक्त जाती जमाती व ओबीसी जमातीच्या लोकांसाठी या सभागृहातच्या माध्यमातून सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम या सभागृहात आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती माजी खासदार विकास महात्मे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com