राष्ट्रवादीला खिंडार?; तब्बल 10 आमदार शिवसेनेच्या वाटेवर

Shivsena, NCP
Shivsena, NCP

मुंबई : समसमान सत्तेचा निर्णय पुढे नेण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील नेते खेचण्याची जोरदार मोहिम सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासारखा मोठा मासा गळाला लागल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार सेनेत येणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बबन शिंदे हे ज्येष्ठ आमदारही सेनेच्या वाटेवर आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचे बंधू भाजपने जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी फडणवीस यांनी केलेली मदत विसरून राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. भाजपची त्यावरची नाराजी हे सेनेचे बळ ठरले आहे. बबन शिंदे यांना भाजपत स्थान मिळणे कठीण झाल्याचे अचूक हेरत सेनेने त्यांना हेरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते खासदार सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल त्यांच्यावर नाराज आहेत. घरातील या नाराजीचा लाभ घेत अनिल यांचे पुत्र अवधूत यांनी सेनेत प्रवेशाचे ठरवले आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पितापुत्रांची भेट झाली. पालघर येथे राष्ट्रवादीचे आमदार सेनेत डेरेदाखल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून आणखी दोन आमदार सेनेच्या संपर्कात आहेत.

भाजपचेही आमदार संपर्कात
नाशिक जिल्ह्यात तेथील भाजपनेते गिरीश महाजन यांच्यावर नाराज झालेले बाळासाहेब सानप यांनी शिवबंधन बांधावे यासाठी सेनेचे प्रयत्न सुरू आहेत.

राणा भाजपत?
दरम्यान राज्यभरातील नेते खेचण्याच्या स्पर्धेत भाजपही आहेच. उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपकडे फारसे काही नाही. तेथे माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते राणा यांना भाजपई केले जाणार आहे. डॉ.पद्मसिंह पाटील यांचा मुलगाच असा बाहेर गेला तर कसे हा प्रश्न विचारला जातो आहे. त्यांचे चुलत घराणे पवनराजे निंबाळकर यांच्यामुळे सेनेत आहे. ते खासदार झाल्यामुळे आता राणा भाजपतर्फे आमदारकी लढतील. कॉँग्रेसकडे लक्ष देण्याचे काम विखे पाटील करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com