esakal | राजगृहप्रकरणी सूत्रधाराला अटक करा - रामदास आठवले
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas-Athawale

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान म्हणून सर्व समाजाची अस्मिता असणारे राजगृह हे निवासस्थान पवित्र आणि ऐतिहासिक आहे. या राजगृहावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्ल्यामागील सूत्रधाराला अटक करावी,’’ अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

राजगृहप्रकरणी सूत्रधाराला अटक करा - रामदास आठवले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान म्हणून सर्व समाजाची अस्मिता असणारे राजगृह हे निवासस्थान पवित्र आणि ऐतिहासिक आहे. या राजगृहावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्ल्यामागील सूत्रधाराला अटक करावी,’’ अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दादर हिंदू कॉलनी येथील ‘राजगृहा’ला आठवले यांनी आज भेट दिली. या वेळी आंबेडकर कुटुंबीयांची आठवले यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. ‘राजगृहा’ला पूर्णवेळ पोलिस संरक्षण म्हणून येथे पोलिस चौकी उभारावी, हल्ल्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही आठवले यांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकजुटीने आंबेडकर कुटुंबीयांसोबत
प्रकाश आंबेडकर आणि आमचे राजकीय मतभेद आहेत; मात्र या प्रसंगात सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही सर्व आंबेडकर कुटुंबीयांसोबत आहोत. राजगृह हल्ला निषेधार्ह असून, याप्रसंगी आम्ही गट तट बाजूला ठेवून एकजुटीने आंबेडकर परिवारासोबत आहोत. त्याची ग्वाही म्हणून राजगृहात येऊन आंबेडकर कुटुंबीयांपैकी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतल्याचेही आठवले यांनी या वेळी सांगितले.

Edited By - Prashant Patil