गोरेवाड्यात ‘डान्सिंग डिअर’चे आगमन

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात नवीन पाहुण्याची भर
Arrival Dancing Deer Gorewada guest Balasaheb Thackeray International Gorewada Zoo nagpur
Arrival Dancing Deer Gorewada guest Balasaheb Thackeray International Gorewada Zoo nagpur sakal

नागपूर : बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात नवीन पाहुण्याची भर पडली आहे. लुप्तप्राय उपप्रजाती संगाई (डान्सिंग डिअर) या हरणाला आज पर्यटकांना पाहण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. राज्यातील पर्यटकांना पहिल्यांदाच संगाई येथे दिसणार आहे. त्यामुळे ते पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात मागील महिन्यात दिल्लीतून संगाई (डान्सिंग डिअर) या हरणाला आणले आहे.

वन्यप्राणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी या प्राण्याला तब्बल दीड महिने विलगीकरणात ठेवण्यात आले. संगाई हे हरिण प्रथम राज्यातील या प्राणिसंग्रहालयात आले आहे. ईशान्य भारतातील मणिपूर या राज्यात हे हरिण आढळते. त्याने विदर्भातील हवामानासोबत जुळवून घेतले आहे. त्यामुळे त्याला आज गोरेवाड्याच्या बंदिस्त जंगलात मुक्त करण्यात आले. गोरेवाडा प्रकल्पाच्या आफ्रिकन सफारीसाठी १०० कोटी रुपये तरतूद केली आहे. प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील आफ्रिकन सफारीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे वासुदेवन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com