esakal | महाराष्ट्रातील चौघांना कला अकादमीचे पुरस्कार

बोलून बातमी शोधा

Lali-Kala-Akademi

चित्रकला, शिल्पकला व छायाचित्रण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राच्या चार कलावंतांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ललितकला अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोलापूरच्या तेजस्विनी सोनवणे आणि मुंबईतील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांड्या यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.

महाराष्ट्रातील चौघांना कला अकादमीचे पुरस्कार
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - चित्रकला, शिल्पकला व छायाचित्रण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राच्या चार कलावंतांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ललितकला अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोलापूरच्या तेजस्विनी सोनवणे आणि मुंबईतील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांड्या यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय ललितकला अकादमीच्या दिल्लीतील मुख्यालयात ४ ते २२ मार्च २०२० दरम्यान आयोजित ६१ व्या राष्ट्रीय ललितकला अकादमी प्रदर्शनात पुरस्कार प्राप्त १५ कलाकारांसह एकूण २८४ कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज ६१ व्या राष्ट्रीय ललितकला अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी व अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे उपस्थित होते. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.