आर्यनकडे ड्रग्ज सापडलेच नव्हते, तपास यंत्रणेचा धक्कादायक खुलासा

आता पुन्हा एकदा हे प्रकरण कोणतं नवं वळण घेणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
Aryan Khan
Aryan Khanesakal

मागील काही दिवसांपूर्वी अभिनेता शहारूख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणी ही कारवाई केली होती. यानंतर अनेक क्षेत्रातून यावर प्रतिक्रियाही उमटल्या. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. आर्यन खान (Aryan Khan) अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) विशेष तपास पथकाला (SIT) आढळून आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे प्रकरण कोणतं नवं वळण घेणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Aryan Khan
"माझे शब्द लिहून घ्या..बाप बेटा जेल जायेंगे"; संजय राऊतांच ट्विट

या खुलास्यामुळे प्रकरणाचा छडा लावणारे एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज (Drugs) आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. कारण त्याचे चॅट्स असे काहीही सुचवत नाहीत की तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता. NCB मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नव्हता आणि गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असे निष्कर्ष एनसीबीच्या (NCB) एसआयटीने काढले आहेत, त्यामुळे या धक्कादायक खुलास्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

काय सांगितले अहवालात

एनसीबीच्या सूत्रांनी या अहवालावर सांगितले, या प्रकरणात दोन न्यायालयांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे ही कारवाई चुकीची होती असे म्हणता येणार नाही. आता हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठेत आहे. तपास अधिकाराशिवाय कोणालाही अटक करण्याचा अधिकार झोनल डायरेक्टरला नाही. नियमांनुसार, कोणत्याही हायप्रोफाईल प्रकरणात छापा टाकल्यानंतर तपास अधिकारी हा संशयित व्यक्तीला अटक करायची की, नाही याचा निर्णय घेतात. परंतु त्याआधी त्यांनी आपल्या अधिक्षकांना ही माहिती द्यावी लागते. अधीक्षक हा झोनल डायरेक्टर यांना माहिती देतो. हे DDG ला सांगितले नंतर सरकारी वकील यांना समजावून सांगितले जाते. त्यानंतरच DG, NCB ला या कारवाईची माहिती दिली जाते. जेव्हा सर्वांची खात्री होते तेव्हा तपास अधिकाऱ्यांकडून अटकेची कारवाई केली जाते. छापेमारीच्या वेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक असल्याचे सांगणारी अशी कोणतीही एसओपीत नाही. तपास अजूनही सुरूच असून या प्रकरणात तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद, व्हिव्हि सिंग आणि NCB झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांची २ वेळा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Aryan Khan
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध शिथील, निम्म राज्य निर्बंधमुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com