देवेंद्र फडणवीस अडचणीत? मुख्य निवडणूक कार्यालयात याचिका दाखल

Devendra-Fadanvis
Devendra-Fadanvis

मुंबई : नागपूर पश्‍चिम मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह मुंबईत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त बलदेव सिंग यांची भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आशिष देशमुख यांच्या विरोधात नागपूर पश्‍चिममधून भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस निवडणूक लढत आहेत.

फडणवीस यांनी निवडणूक अर्ज भरताना मागील तारखेचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात देशमुख यांनी नागपूरच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांकडेदेखील तक्रार केली होती; परंतु, तेथे दाद मिळत नसल्यामुळे त्यांनी आज मुंबईत मुख्य निवडणूक कार्यालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली.

देशमुख यांच्यासोबत कॉंग्रेसच्या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे नेते सोनल पटेल, गायकवाड, चरणसिंग सप्रा, भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर यांचा समावेश होता. गायकवाड म्हणाले, की फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने अशी मोठी चूक करावी आणि नागपूर येथील निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष करावे हे आश्‍चर्यकारक आहे. म्हणून आम्ही मुंबईत याचिका व तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याचे आश्‍वासन आम्हाला मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून, आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com