
महाराष्ट्राच्या अवकाशात अधर्माची अहंकारी वादळं कितीही निर्माण झाली तरी ...
'महाराष्ट्रातील अस्मानी, सुलतानी कारभाराला कडक डोस मिळणार'
उद्या म्हणजे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपाने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. कोरोनानंतर भाजपने एवढा मोठा सोहळा करायचा योजला आहे. यासाठी हजारो कार्यकर्ते सोमय्या ग्राऊंडवर येणार असल्याची माहिती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली. कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं. दरम्यान, यासंदर्भात आता शेलारांनी आणखी एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्राच्या अवकाशात अधर्माची अहंकारी वादळं कितीही निर्माण झाली तरी या अस्मानी, सुलतानी कारभाराला "डोस" मिळणार, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. (1 may booster dose sabha of BJP)
हेही वाचा: काँग्रेस आता फक्त भाऊ-बहिणीचा पक्ष; जे.पी.नड्डांचा खोचक टोला
यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं असून यात १ मेच्या सभेची माहिती देत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. शेलार म्हणतात, भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा...महाराष्ट्राच्या अवकाशात अधर्माची अहंकारी वादळं कितीही निर्माण झाली तरी..या अस्मानी, सुलतानी कारभाराला "डोस" मिळणार! 1 मे ला सोमय्या मैदानात बुस्टर डोस सभा, सह्याद्रीची सिंहगर्जना! जय शिवशंभू राजा!, असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 1 मेच्या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा होणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार असल्याचं ते म्हणाले होते. मेट्रोच्या कामाच्या लपत दगड मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच पोलखोलमधून आम्ही ज्यांची लक्तरे घेतो त्यांचा आढावा घेणार आहोत. कुणी 14 मे ला सभा घेणार आहेत कुणी 1 मे ला सभा घेत आहेत या सर्वांना कडकडीत डोस दिला जाईल, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लगावला होता.
हेही वाचा: रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, म्हणाल्या..
Web Title: Ashish Shelar Criticized To Mahavikas Govt On 1 May Booster Dose Sabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..