माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित; आशिष शेलार यांचा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 जून 2017

मुंबई - ""माझ्यावर आज जे आरोप केले गेले आहेत, ते जुनेच आहेत. त्यांचा त्या त्या वेळी मी सविस्तर कागदपत्रांसह पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे, असा खुलासा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शनिवारी केला.

मुंबई - ""माझ्यावर आज जे आरोप केले गेले आहेत, ते जुनेच आहेत. त्यांचा त्या त्या वेळी मी सविस्तर कागदपत्रांसह पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे, असा खुलासा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शनिवारी केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन शेलार यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांचे खंडन त्यांनी केले. "" "सर्वेश्‍वर' आणि "रिद्धी' या दोन कंपन्यांच्या नावे माझ्यावर आरोप करण्यात आले असले तरी माझा आता या कंपन्यांशी कोणताही संबंध नाही. मी राजीनामा दिल्याची व अन्य कागदपत्रं संबंधित यंत्रणेला सादर केली आहेत. अन्य कपंन्यांची व व्यक्‍तींची जी नावे माझ्याशी जोडली जात आहेत, ती खोडसाळपणे जोडली जात आहेत,'' असे ते म्हणाले. माझी कुणाशीही भागीदारी नाही, तसेच मी कुठल्याही कंपनीत संचालक मंडळावर नाही, त्यामुळे त्या कंपन्यांमधील अन्य कोणा व्यक्‍तीचे व अन्य कुणाशी असलेल्या व्यवहाराशी माझा संबध नाही आणि मला त्यांची कल्पना नाही, असेही त्यांनी सांगितले.

""राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे छगन भुजबळ यांची जी चौकशी सुरू आहे, त्याच्याशी संबंधित कंपन्या, व्यक्‍तीशी माझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही, त्यामुळे हे आरोप माझी बदनामी करणारे आहेत. रियाज भाटी हा "राष्ट्रवादी'चा कार्यकर्ता असल्याचे त्याने जाहीरपणे सांगितले आहे, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. तो एका क्‍लबचा सदस्य असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तो मतदार आहे. त्याची माझ्यासह अन्य सर्वपक्षीय नेत्यांसोबत छायाचित्रे आहेत.'' असा खुलासाही त्यांनी केला.

Web Title: ashish shelar marathi news maharashtra news mumbai news