'मोदींना सोडल्यापासून उद्धव ठाकरेंची केवढी ही धावाधाव'

महापालिकेतील झटक्याचा सांगावा घेऊन या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना भेटायला तर आले नव्हते राव?
political
politicalesakal
Summary

महापालिकेतील झटक्याचा सांगावा घेऊन या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना भेटायला तर आले नव्हते राव? - शेलार

सध्या राजकीय वातावरणात अनेक घडामोडी सुरु आहेत. मुंबई महापालिका (BMC) निवडणूकांच्या मोर्चेबांधणीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टोलेबाजीवर चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आता भाजपाचे (BJP) आशिष शेलार यांनी तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी यमक जुळणाऱ्या काही ओळी ट्वीट करत टीका केली आहे.

political
मराठीच्या अभिजात दर्जासाठी हालचालींना वेग; दिल्लीत भेटीगाठी

ते म्हणाले, कधी कधी म्हणणार शरदचंद्र पवार हेच 'साहेब' तर कधी पश्चिम बंगालच्या दीदीच्या ममतेच्या छायेत, मध्येच अचानक म्हणतात के. चंद्रशेखर हेच आमचे 'राव', हेही करुन पाहिले एकदा, अहमद पटेल नाही तर किमान हार्दिक 'पटेल', हिंदुत्वाचे सोडून दिले गाव, मोदींना सोडल्यापासून केवढी ही धावाधाव!, असेही ते म्हणाले आहेत. तेलंगणातील हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने जबाबदारी दिल्याने ती निवडणूक जवळून पाहता आली. के.सी राव यांच्या विरोधात मतदान करुन जनतेने भाजपाला विक्रमी कौल दिला होता. त्या महापालिकेतील झटक्याचा सांगावा घेऊन या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना भेटायला तर आले नव्हते राव?, असा सवाल त्यांनी केला आहे.

political
'Akhilesh Yadav औरंगजेब आहे; जो आपल्या बापाचा कधी होऊ शकला नाही, तर तो..'

दरम्यान, कालच्या तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका सुरु आहे. आता शेलार (Aashish Shelar) यांच्या या टीकेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. या ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com