मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

मुंबई : कोरेगाव भीमा दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉंबनिर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही; मात्र आज ऑगस्टा वेस्टलॅंडबाबत पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांवर खोटे आरोप केले. त्यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

अशोक चव्हाण यांनी पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांच्या आरोपांचा पंचनामा केला. ते म्हणाले, की निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कॉंग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन खोटे आरोप करण्याचा कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे. आजची मुख्यमंत्र्यांची परिषद हा त्याचाच भाग आहे. फडणवीस यांनी राज्यातील प्रश्‍नांवर आणि राफेल विमान खरेदी गैरव्यवहारावरही पत्रकार परिषदा घ्याव्यात. राज्यात 17 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रिमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यांवर आरोप आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, ख्रिस्तियान मिशेलच्या मागे लपून भाजप सरकार आपला भ्रष्टाचार आणि गैरप्रकार लपवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे चव्हाण म्हणाले. कॉंग्रेस सरकारने ऑगस्टा वेस्टलॅंडला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यावर ही बंदी उठवून त्यांना मेक इन इंडियात सहभागी का करून घेतले, याचे उत्तर मोदींनी द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Ashok Chavan criticise CM