नाणारवरून सेना भाजपचा वरून कीर्तन आतून तमाशा : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

घरादारांवर शेतावर नांगर फिरवून विकास जो विकास केला जात आहे. तो विकास आता नको. शेतकऱयांच्या जमिनी बळकाविण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. 

नाणार : घरादारांवर शेतावर नांगर फिरवून विकास जो विकास केला जात आहे. तो विकास आता नको. शेतकऱयांच्या जमिनी बळकाविण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. इंग्रजकाळांपेक्षा जास्त दंडेलशाही सुरु आहे. नाणारच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपची वरून कीर्तन आतून तमाशा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर सोडले. 

नाणार येथे आयोजित काँग्रेसच्या सभेत अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, इंग्रजकाळांपेक्षा जास्त दंडेलशाही आता सुरु आहे. अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. तसेच शिवसेनेची आताची अवस्था एवढी वाईट झाली तरी शिवसेना सत्तेत आहे. कोणतीही अधिसूचना रद्द करण्यास अवघे 10 मिनिटे लागतात. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई घोषणा करून गेले, 10 दिवस झाले, अद्याप अधिसूचना रद्द करण्यात आली नाही. सत्ताधारी पक्षाचे लोक दलाली खाऊन गुजराती लोकांना जमिनी मिळवून देत आहेत.
 

Web Title: Ashok Chavan Criticizes BJP Government on Issue of NANAR