भाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

नगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने पाडलेला आश्‍वासनांचा पाऊस कसा खोटा ठरला, याच सरकारच्या काळात भ्रष्टाचार कसा वाढला आणि त्यात आश्‍वासने पूर्ण करण्यात सरकारचे अपयश यांसारख्या मुद्यांवर सडाडून टीका केली जात आहे. देशातील पाचपैकी तीन राज्यांत काँग्रेसला यश मिळाले. त्यामुऴे भाजप सरकारविषयी असलेली चीड व्यक्त झाली. आता लोक जागृत होऊ लागल्याने कॉंग्रेसला राज्यात पुन्हा चांगेल दिवस येणार असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. 

श्रीगोंदे येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आज जिल्ह्यात आले होते. नगर येथे प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी थांबले होते. या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विविध विषयांवर पक्षाची भूमिका मांडली. आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार उल्हास पवार, हेमंत ओगले यांच्यासह पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, की कोल्हापूरपासून जनसंघर्ष यात्रेची सुरवात केली. समारोप येत्या 25 तारखेला कोकणात होणार आहे. या यात्रेदरम्यान अनेक सभा झाल्या. लोकांचे प्रश्न समजावून घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, पिकांना दराचे प्रश्न, बेरोजगारी, सामाजिक आरक्षणे या विषयांवर लोकांचे मत तीव्र आहेत. सरकारने केवळ घोषणा केल्या, प्रत्यक्षात लोकांच्या पदरात काहीच टाकले नाही, हे दिसून आले. लोकांचा आवाज बुलंद करण्याचे काम जनसंघर्ष यात्रेतून करण्यात आला आहे. सरकार प्रत्येक प्रश्नात अपयशी ठरत आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, असा हल्लाबोल चव्हाण यांनी भाजप सरकारवर केला. 

दरम्यान, जनसंघर्ष यात्रा संपल्यावर पुन्हा राज्यभरात किमान 50 सभा घेण्याचे नियोजन केले आहे. निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून, या सभांमधून सरकारचे अपयश उघडे केले जाणार आहे, असे ते म्हणाले. 

डान्सबारबाबत सरकारला बाजू मांडता आली नाही 

तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी डान्सबार बंद केले. त्यातून समाजात होणारे दुष्परिणाम रोखले होते. आता प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सध्याचे भाजप सरकार त्याविषयीची बाजू मांडण्यात कमी पडले. त्यामुळेच डान्सबारवरची बंदी उठली. सरकारने डान्सबार विरोधाची भूमिका व्यवस्थित मांडली असती, तर ही वेळ आली नसती. आज या निर्णयाचे समाजातून तीव्र नाराजी दिसून येत असल्याचे ते म्हणाले. 

Web Title: Ashok Chavan Political Statement about BJP Government