राज्यातील आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही - सवरा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - राज्यात 1075 आश्रमशाळा आहेत. यापैकी 529 शासकीय आणि 546 खासगी आश्रमशाळा आहेत. यापैकी खासगी आणि शासकीय मिळून 149 आश्रमशाळांत सीसीटीव्ही बसविण्यात येत असून, उर्वरित शाळांमध्येही जिथे आवश्‍यकता असेल त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी दिली. 

दिवसेंदिवस शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व आश्रम शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी विधानसभेत भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. भाजपच्या मनीषा चौधरी यांनी याबाबत उपप्रश्न उपस्थित केला. 

वेतनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी  बॅंक खाती तपासणार - येरावर 
राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महावितरण कंपनीला पुरविण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या वेतन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याची बाब गंभीर आहे. त्यामुळे त्यांना मिळणारे वेतन सरकारच्या धोरणानुसार कमीत कमी वेतन नियमांतर्गत मिळते की नाही हे तपासण्यासाठी कंत्राटी कंपन्यांची बॅंक खाती तपासणार असल्याचे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर यांनी विधानसभेत शुक्रवारी दिले. महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांच्या वेतनात गैरव्यवहार होत असल्याबाबतचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल यांनी उपस्थित केला. तर त्यावर डॉ. सुजीत मिणचेकर, राजेंद्र पटनी यांनी उपप्रश्न विचारले. त्यास उत्तर देताना मंत्री येरावर यांनी वरील आश्वासन दिले.

Web Title: The ashram schools in CCTV