शिशे के घरमें रहनेवाले पत्थर नही फेका करते! - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

सिडको प्रकरणावरून आज विधानसभेत गदारोळ होईल, हे अपेक्षित होते. विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना उत्तर देताना, ‘शिशे के घरमें रहनेवाले पत्थर नही फेका करते,’ असे उत्तर देऊन विरोधकांना तंबी दिली.

प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला. यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमक होत, सिडकोप्रकरणी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. सिडको प्रकरणाची फाइल ज्या गतीने फिरविण्यात आली, ती गती या राज्य सरकारच्या इतर कामांत दिसत नाही, असा टोला विखे पाटील यांनी मारला. या वेळी विखे पाटील यांनी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचाही उल्लेख करीत सत्ताधारी पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला. भोसरी येथील भूखंडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेतला, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग स्थापन केला. या प्रकरणातही फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी सूचना केली व चौकशी प्रभावित होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे यांनी केली. त्यांच्या आरोपांना फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्तारूढ पक्षाचे सदस्यही शांत होते.

Web Title: Assembly CIDCO scam