सलग नवव्या दिवशी विधानसभा ठप्प 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या रेट्यामुळे आज विधानसभेचे कामकाज ठप्प झाले. कामकाज बंदचा सिलसिला आजही कायम राहिला असून, या गोंधळातच आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. गोंधळ आणि घोषणाबाजीमध्येच विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तो मांडला.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. दोन्ही बाकांवरील सदस्यांनी घोषणा देण्यास सुरवात केली. या गदारोळामुळे कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले. त्यानंतरही गदारोळ सुरू राहिल्याने पुन्हा अर्धा तासासाठी सभागृह तहकूब केले. कामकाजाचा एक तास वाया गेल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदस्यांच्या गोंधळ आणि गदारोळातच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला. आर्थिक पाहणी अहवालानंतर आधी एक तासासाठी आणि नंतर पुन्हा एक तास असे दोन तास कामकाज थांबल्यानंतरही विरोधक आणि शिवसेनेचा गोंधळ सुरू राहिल्याने शेवटी तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी शुक्रवारचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. 

Web Title: Assembly stop on the ninth day