एटीएममध्ये रोकड उपलब्ध करण्याचे आव्हान

कैलास रेडीज
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

रोकड व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांपुढे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्‍न

मुंबई - पाचशे आणि हजारच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया बॅंकांकडून सुरू केली असली, तरी एटीएम मशिनमध्ये पुरेशी रोकड उपलब्ध करताना रोकड व्यवस्थापन करणाऱ्या (कॅश मॅनेजमेंट) कंपन्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एटीएममधील जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा बदलणे, नव्या नोटांचा भरणा करणे, मशिनमध्ये नवीन स्लॉट तयार करणे आणि सुरक्षित वाहतूक करण्याचे आव्हान कॅश मॅनेजमेंट कंपन्यांपुढे उभे ठाकले आहे.

पुढील तीन दिवसांमध्ये जास्तीत जास्त एटीएममध्ये पैसे उपलब्ध करण्यासाठी बॅंकांकडून तितक्‍याच प्रमाणात रोकड मिळणे आवश्‍यक असल्याचे मत या कंपन्यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक एटीएमची क्षमता 40 लाखांची आहे. ती वाढवण्यासाठी कॅश मॅनेजमेंट कंपन्यांना आता नव्याने काम करावे लागेल. त्यामुळे सरसकट रोकड उपलब्ध करण्याची प्रक्रिया वेळखाऊ बनली आहे. रोख रकमेच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य असून, त्यानुसार योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे सीएमएस इन्फोसिस्टमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कौल यांनी सांगितले. प्रत्येक एटीएममध्ये रोकड उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांना सज्ज करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशभरात पुढील दोन ते चार आठवड्यांत संपूर्ण एटीएम यंत्रणा पूर्ववत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या दिवशी हाल सुरूच
शहरातील काही खासगी आणि आंतरराष्ट्रीय बॅंकांचा अपवाद वगळता शनिवारी (ता.12) बहुतांश एटीएम कॅशविना कोरडीठाक पडली. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचे हाल झाले. ज्या एटीएममध्ये रोकड होती तिथे सकाळच्या वेळेत ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही तासांत रोकड संपल्याने नागरिकांना निराश होऊन बॅंकांची वाट धरावी लागली.

40 हजार कर्मचारी दिवसरात्र काम करणार
एटीएम मशिन हाताळणाऱ्या कॅश मॅनेजमेंट कंपन्यांची संघटना असलेल्या कॅश लॉजिस्टिक असोसिएशन ऑफ इंडियासाठी पुढील 72 तास अटीतटीचे असणार आहेत. देशभरात 650 जिल्ह्यांमध्ये 2 लाख 20 हजार एटीएम मशिन्स आहेत. त्यातुलनेत या सर्व कंपन्यांचे मनुष्यबळ जेमतेम 40 हजार असल्याने कर्मचाऱ्यांना पुढील 72 तास दिवसरात्र काम करावे लागेल. सुरक्षारक्षक आणि वाहने यांच्यावर मात्र ताण येणार आहे.

Web Title: ATM cash available to challenge