एटीएम फोडणारे तिघे गुजरातमध्ये जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

उपनगर येथे पुणे महामार्गावरील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून 28 लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना अहमदाबाद (गुजरात) येथून अटक करण्यात आली आहे.

नाशिक : उपनगर येथे पुणे महामार्गावरील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून 28 लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना अहमदाबाद (गुजरात) येथून अटक करण्यात आली आहे.

संशयित चोरट्यांनी नाशिकमध्येच नव्हे, तर औरंगाबाद, कराड, इस्लामपूर येथेही एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरून गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. साहुन अली मोहम्मद खान (रा. हरियाना), जुबेर जुम्मा खान (रा. गुजरात), शौकिन जानू खान (रा. हरियाना) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 

Web Title: ATM thrashed Three Arrested in Gujarat