Ashok Chavan : विरोधकांकडून माझं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न ; अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

Suspension of development works in border areas should withdrawn Ashok Chavan politics nanded
Suspension of development works in border areas should withdrawn Ashok Chavan politics nanded sakal

आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसंच घातपाताचा प्रयत्नही केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. अशोच चव्हाण यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणावर अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले.

माझ्यावर पाळत ठेवून माझा घातपाल करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. माझ्या नावाने उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र व्हायरल होत आहे. तसेच माझ्याबद्दल गैरसमज पसरवून राजकीय फायदा उचलला जात आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

अशोक चव्हाण म्हणाले, माझ्या राजकीय विरोधकांकडून मला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी नांदेड पोलिसात मी तक्रार दाखल केली आहे. 

माझा मेटे केला पाहीजे, अशी चर्चा होती. याबाबत मी पोलिसांना माहिती दिली होती. एक बनावट पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मी मराठा समाजाच्या विरोधात उद्धव ठाकरेंना लिहलेला काही मजकूर होता. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशा प्रकारचा त्या पत्रात उल्लेख होता. माझी बदनामी करुन राजकीय फायदा उचलण्याचा खटाटोप विरोधक करत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

Suspension of development works in border areas should withdrawn Ashok Chavan politics nanded
Prakash Ambedkar : ...तर उद्धव ठाकरे गट निवडणुकीपासूनही वंचित

चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच माझी भूमिका घेतली. हे प्रकरण धार्मिक, सामाजिक भावना भडकवने आहे, माझ्या विरोधात रचलेला हा मोठा कट आहे.

Suspension of development works in border areas should withdrawn Ashok Chavan politics nanded
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; सिब्बल म्हणाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com