हिंदूद्वेष भिनलेले दुतोंडी गांडूळ; भातखळकरांचा केजरीवालांवर हल्लाबोल

द कश्मिर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यू ट्यूबवर टाकण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले होते
Arvind Kejriwal and Atul Bhatkhalkar
Arvind Kejriwal and Atul Bhatkhalkarसकाळ डिजिटल टीम

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे हा चित्रपट दिल्लीत करमुक्त करण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm Arvind Kejriwal) यांनी गुरुवारी दिल्ली विधानसभेत भाजपवर निशाणा साधला. द कश्मिर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यू ट्यूबवर टाकण्याचा आवाहन त्यांनी केले होते. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केजरीवाल यांच्यावर ताशेरे ओढले.

Arvind Kejriwal and Atul Bhatkhalkar
योगींच्या शपथविधीपूर्वीच लखनऊमध्ये चकमक; दरोडेखोर ठार

अतुल भातखळकर ट्वीट द्वारे म्हणाले, “सांड की आंख, निल बट्टे सन्नाटा या टुकार चित्रपटांना कर माफी देणारे, आपल्या सरकारच्या प्रत्येक कामाची करोडोंची जाहिरात वृत्तपत्रात देणारे अरविंद केजरीवाल ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यू ट्यूबवर टाकण्याचा फुकटचा सल्ला देत आहेत. हिंदूद्वेष नसानसात भिनलेले दुतोंडी गांडूळ”

Arvind Kejriwal and Atul Bhatkhalkar
"'द काश्मीर फाईल्स' चित्रपट करमुक्त करण्याऐवजी YouTube वर टाकावा"

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' दिल्लीत करमुक्त करण्याच्या मागणीला गुरुवारी केजरीवाल दिल्ली विधानसभेत उत्तर देताना म्हणाले, , "काही लोक काश्मिरी पंडितांच्या नावावर करोडो रुपये कमवत आहेत. आणि तुम्हाला (भाजप) पोस्टर लावण्याचे काम दिले आहे. तुम्ही लोक काय करत आहात, ते डोळे उघडा.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपटाचे कौतुक केले. याशिवाय सर्वसामान्यांनी हा चित्रपट पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले अनेक भाजपशासित राज्यांनी चित्रपट करमुक्त केला. दिल्लीतसुध्दा हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी केली जात आहे. यावर केजरीवाल यांनी द कश्मिर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यूट्यूबवर अपलोड करण्यास सांगावे. कारण तिथे प्रत्येकजण तो चित्रपट फ्री पाहू शकतील असा टोला भाजपला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com