उसवलं गनगोत सारं, आधार कुनाचा न्हाई; भातखळकरांचा काँग्रेसला टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

उसवलं गनगोत सारं, आधार कुनाचा न्हाई; भातखळकरांचा काँग्रेसला टोला

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Election Results) आज लागले. यापैकी पंजाबमध्ये आप वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपने आपला डंका वाजवला तर काँग्रेस एकाही राज्यात बहुमत मिळवू शकला नाही. यावरुन भाजप नेते जोरदार काँग्रेसवर टोलेबाजी करत आहे. यातच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत राहूल गांधींवर निशाणा साधलाय.

अतुल भातखळकर यांनी राहूल गांधी यांचा निराशाजनक फोटो पोस्ट करत अजय अतुल यांच्या गाण्यातील दोन ओळी ट्वीट केल्या. ते ट्वीटद्वारे म्हणाले, “उसवलं गनगोत सारं, आधार कुनाचा न्हाई…

हेही वाचा: पाच राज्यांच्या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम?

देशातील पाच राज्याच्या निवडणुकीतुन काँग्रेसला खुप अपेक्षा होती पण पाचही राज्यात काँग्रेसला अपयश आले. त्यामुळे हा काँग्रेससाठी हा काळा दिवस म्हणावा लागेल. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने पत्रकार परिषद घेत देशासमोर आपली भूमिका मांडली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय की, वास्तव मान्य आहे की, काँग्रेसने जे प्रयत्न केले ते मतांमध्ये परिवर्तीत होऊ शकले नाहीत. उत्तराखंड आणि गोव्यामध्येही आम्ही चांगला लढा दिला मात्र, तरीही आम्ही मॅजिक फिगर गाठू शकलो नाही. काँग्रेस या निवडणुकीमध्ये असा पक्ष म्हणून उभा राहिला जो भाजपच्या फुटीरतावादी, द्वेषमूलक आणि जातीयवादी राजकारणाला पर्याय म्हणून उभा राहिला.

Web Title: Atul Bhatkhalkhar Critisized On Rahul Gandhi As He Failed In Election Of Five State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top