'शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यांच्याच विचारांचे चंद्रकांत पाटील' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यांच्याच विचारांचे चंद्रकांत पाटील'

'शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यांच्याच विचारांचे चंद्रकांत पाटील'

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला, भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर सध्या राजकीय वर्तुळात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपच्या नेत्यांना राहून राहून फिट्स येत आहेत, अशी टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याची त्यांची जुनी खोड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे जातीपातीच्या आणि धर्माच्या पलीकडचे होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मात्र भाजप नेते त्यांचे नाव घेऊन नेहमी राजकारण करत असतात.

हेही वाचा: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं; सख्खे 4 भाऊ 'आमदार'

ते म्हणतात, अधूनमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यावर काहीतर प्रतिक्रीया द्यायची आणि चर्चेत येण्याचं काम भाजप नेते वारंवार करत असतात. त्यांना राहून राहून फिट्स येत असतात. मात्र छत्रपती शिवाजी महारांजांनी सामान्य माणसाला त्याचे मानवी अधिकार दिले तशी त्यांची शिकवण होती. महिलांना स्वातंत्र्य, सन्मान देणार असं त्यांच सर्वसामान्यांचं राज्य होतं. पंतप्रधान मोदींचं बरोबर याउलट आहे. कुठे काही मुठभर लोकांसाठी, मित्रांसाठी ते राष्ट्राची संपत्ती विकणारे आहेत. अनेकांना बेरोजगार करणारे त्यामुळे त्यांची तुलना कशी काय होऊ शकते. चंद्रकात पाटील तुम्ही त्या विचारांचे आहात, ज्या विचाराने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता. त्याविषयी कधी बोलणार आहात का? असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाजी महाराजांनी मानवी मूल्यांची व्होट बँक तयार केली आहे हे लक्षात असूद्या असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: 'माझं वय 23 आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांकडं काहीच ठेवत नाही'

Web Title: Atul Londhe Criticized On Chandrakant Patil Reaction Of Statement Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..