सरकार आणखी 862 जागा भरणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

औरंगाबाद - राज्यसेवेच्या 69 आणि वनसेवेच्या केवळ 26 जागांच्या जाहिराती आल्याने प्रचंड तणावाखाली असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार संयुक्त पूर्वपरीक्षा (गट क) होणार असून, दुय्यम निरीक्षक, कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदाच्या 862 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कर्मचारी कपातीचे शासनाचे धोरण, "डमी' उमेदवारांचे रॅकेट प्रकरण आणि समांतर आरक्षणावरून लांबत चाललेले निकाल या कारणांमुळे आधीच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात "एमपीएससी'ने राज्यसेवेसाठी केवळ 69 जागांची जाहिरात दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले होते. विक्रीकर निरीक्षक आणि वन सेवेच्या जाहिरातीनेही निराशाच केली.

त्यामुळे राज्यभर विद्यार्थ्यांचे मोठे मोर्चे निघाले. या पार्श्‍वभूमीवर "एमपीएससी'ने गुरुवारी 862 जागांची जाहिरात दिल्याने विद्यार्थ्यांच्या जिवात जीव आला आहे. यात दुय्यम निरीक्षकाच्या 33, कर सहायकाच्या 478, लिपिक टंकलेखक (मराठी) 316 आणि लिपिक टंकलेखक (इंग्रजी) 35 अशा जागांचा समावेश आहे. या जागांच्या संख्येत वाढीची शक्‍यताही आहे. परीक्षेचे ऑनलाइन अर्ज 11 एप्रिलपर्यंत सादर करायचे आहेत. संयुक्त पूर्वपरीक्षा 100 गुणांची असून, ती 10 जूनला होईल.

Web Title: aurangabad maharashtra news government 862 seats increas mpsc forest