कर्जमाफीचं खरं श्रेय शेतकऱ्यांना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

उद्धव ठाकरे यंनी शेतकरी व शिवसेनेच्या एकजुटीमुळे कर्जमाफी करावी लागल्याचं वक्तव्य केलं होतं.

औरगाबाद : "कर्जमाफी शेतकरी संपामुळे भाजप सरकारने केली आहे. मागणी तर सर्वच पक्षांनी केली होती. कर्जमाफीचं खरं श्रेय आहे ते शेतकऱ्यांचेच," असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज येथे व्यक्त केले.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यंनी शेतकरी व शिवसेनेच्या एकजुटीमुळे कर्जमाफी करावी लागल्याचं वक्तव्य केलं होतं. याविषयी त्यांना विचारलं असता वरील मत व्यक्त केलं.

राज्य सरकारनं महापालिकेला रस्त्यासाठी 100 कोटी मंजुर केल्याची घोषणा करण्यासाठी महापौर बंगल्यावर ते आले होते, यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.

सरकारनामावरील आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
सातारा: गोरेंना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण्यासाठी पतंगराव कदमांचा अल्टिमेट
विद्यार्थी वाहतूक अनुदानावरून सर्वसाधारण सभेत तुकाराम मुंडे यांच्यावर टीका​
" नारायण राणेंबाबत मी  काहीही बोलणार नाही ''​
'स्वाभिमानी'तून सदाभाऊंची उद्या हाकलपट्टी ?​
रिपब्लिकन ऐक्‍य की मृगजळ?​
आमदार जगताप व लांडगे यांच्या वादात भाजपचे तीन तेरा​

Web Title: aurangabad news farmers strike credit war raosaheb danve uddhav thackeray