मुंबईत 9 ऑगस्टला मराठा क्रांती महामोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

- 13 जुलैला कोपर्डी येथे क्रांती ज्योतीला श्रद्धांजली अर्पण करणार
- सरकारकडे चर्चेला जाणार नसल्याची भूमिका
- राज्यभरात वेगवेगळे दौरे करीत जनजागृती करणार आहेत.
- तालुका, गावपातळीवर घेणार बैठका

औरंगाबादः मराठा क्रांती मोर्चातर्फे 9 ऑगस्टला मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या संदर्भात आम्ही ठाम असून सरकारने निर्णय घ्यावा. यापुढे सरकारशी चर्चा करणार नसल्याची भूमिका समन्वय समितीतर्फे घेण्यात आली. औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीतर्फे आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

रायगडावर 6 जून रोजी झालेल्या शिवराज्यभिषेक दिन सर्व मराठा समाजाने शथप घेत मुंबई महामोर्चाचा निर्णय घेण्यात आला. 9 ऑगस्ट रोजी राज्यभरातील मराठा समाजाला एकत्रित करून मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच 13 जुलैला कोपर्डी प्रकरणास एक वर्ष पुर्ण होणार आहेत. यामूळे या दिवशी राज्यभरातील सर्व मराठा संघटनांचे सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व तसेच मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक एकत्रित येवून त्या क्रांती ज्योतीला श्रद्धाजंली अर्पण करणार आहे. याच वेळी मुंबईच्या महामोर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच 18 जुलै नाशिक येथे राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहेत.

Web Title: aurangabad news maratha kranti morcha