तीन दिवसांत दूध दरवाढ: महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

पूर्वीच्या सरकारने सरकारी ब्रॅण्ड मारले
यापूर्वीच्या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांनी दुधाचे आपले स्वतःचे ब्रॅण्ड निर्माण केले आणि सरकारी ब्रॅण्डला मारले असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. आता सरकारच्या वतीने आपलेच "आरे'चे दोन ब्रॅण्ड तयार करण्यात आले आहेत. महानंदलाही ऊर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद जिंतूर येथील जुने सरकार भंगारात काढू पाहणाऱ्या जुन्या मशिनरी जालन्यात नेल्यानंतर तेथे एक लाख लिटरचे संकलन होत आहे. आता अमूलच्या धर्तीवर सरकार आपला स्वतःचा ब्रॅण्ड तयार करण्याठी प्रयत्नशील असल्याच महादेव जानकर म्हणाले.

औरंगाबाद - तीन दिवसांत गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचा दर हा अनुक्रमे २७ आणि ३७ रुपये प्रति लिटर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

अनेक संस्था दुधाचा दर वाढवला की डबघाईची भाषा करतात. पण सरकारी मदत घेताना "नाव शेतकऱ्याचे, काम आपले' हे धोरण आपण अजिबात खपवून घेणार नसल्याची तंबी मंत्री जानकर यांनी दिली.

एका खासगी कार्यक्रमानिमित्त पशुसंवर्धन मंत्री जानकर हे शनिवारी (ता. १०) औरंगाबादेत आले होते. राज्यात गेल्या सरकारपेक्षा लिटरमागे ६ रुपये अधिक दर आपण दिला. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे दर वाढवण्यात येत असताना अनेक संस्था या आपण डबघाईला आलो असल्याची भाषा करतात आणि हे वाढीव दर देण्यास असमर्थता दाखवतात. "नाव शेतकऱ्याचे, काम आपले' जर होणार असेल तर सरकार हे खपवून घेणार नाही. असेच जर होणार असेल तर या संस्थांना अात्तापर्यंत मिळालेली सरकारी मदत कुठे गेली याचा शोध घ्यावा लागेल, असा इशारा या वेळी श्री. जानकर यांनी दिला. राज्य सध्या गायीच्या दुधाचा खरेदी दर हा २४ रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर हा लिटरला ३० रुपये आहे. हे दर आत २७ आणि ३७ रुपये करण्यात येणार आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा केली असल्याचेही जानकर यांनी सांगितले. औरंगाबेदत शासकीय दूध डेअरीच्या जागेत भव्य मत्स्यालयाची उभारणी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पूर्वीच्या सरकारने सरकारी ब्रॅण्ड मारले
यापूर्वीच्या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांनी दुधाचे आपले स्वतःचे ब्रॅण्ड निर्माण केले आणि सरकारी ब्रॅण्डला मारले असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. आता सरकारच्या वतीने आपलेच "आरे'चे दोन ब्रॅण्ड तयार करण्यात आले आहेत. महानंदलाही ऊर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद जिंतूर येथील जुने सरकार भंगारात काढू पाहणाऱ्या जुन्या मशिनरी जालन्यात नेल्यानंतर तेथे एक लाख लिटरचे संकलन होत आहे. आता अमूलच्या धर्तीवर सरकार आपला स्वतःचा ब्रॅण्ड तयार करण्याठी प्रयत्नशील असल्याच महादेव जानकर म्हणाले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी

अंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन​
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

Web Title: Aurangabad news milk price hiked says Mahadev Jankar