शेतकरी व शिवसेना एकत्र आल्यामुळे कर्जमुक्ती- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

औरंगाबाद येथे आज (सोमवार) संवाद यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारने घेतलेल्या 34 हजार कोटींच्या कर्जमुक्तीच्या निर्णयाबाबत त्यांनी भाष्य केले. 

औरंगाबाद - शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे सरकारला कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा लागला. सरकारने जून 2016 ऐवजी जून 2017 पर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.

औरंगाबाद येथे आज (सोमवार) संवाद यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारने घेतलेल्या 34 हजार कोटींच्या कर्जमुक्तीच्या निर्णयाबाबत त्यांनी भाष्य केले. 

उद्धव ठाकरे म्हणाले - 

 • कर्जमुक्तीला फॅशन मानणाऱ्यांकडून शिवसेनेने कर्जमुक्ती करून घेतली.
 • शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे. 
 • शिवसेना मी कर्जमुक्त होणार हे अभियान सुरु करत आहे.
 • शिवसेनेने दहा हजारांची मदत करावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण, त्यासाठी खूप जाचक अटी टाकण्यात आल्या होत्या. त्या आम्ही काढायला लावला. 
 • कर्जमुक्तीसाठी आम्ही बऱ्याच सूचना केल्या होत्या. नगर, नाशिकचा पट्टा अजूनही अस्वस्थ आहे. 
 • शेतकऱ्यांच्या सूचनांचा पाठपुरावा करणार आहे. 
 • नियमितपणे कर्ज परतफेड करत आहे, त्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ व्हावी. 
 • पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार
 • शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 • 40 लाख शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार आहे का, याचाही चौकशी करा
 • किती शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा होणार आहे, याची विभागवार यादी आम्हाला मिळावी.
 • बँकांनीही याबाबतची माहिती जाहीर करावी.
 • भाजपला मंत्रीपदे हवी असतील तर घ्या, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशी आमची भूमिका आहे.
 • पुणतांब्यातील शेतकऱ्यांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या
 • शेतकऱ्यांना नोटबंदीचा मोठा फटका बसला आहे
Web Title: Aurangabad news Uddhav Thackeray talked about farmer loan waiver