‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले

नागपूर - अवनी वाघिणीला मारल्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये आज निदर्शने करण्यात आली.  महाराज बाग ते संविधान चौकादरम्यान रॅली काढून निषेध व्यक्त केला.
नागपूर - अवनी वाघिणीला मारल्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये आज निदर्शने करण्यात आली. महाराज बाग ते संविधान चौकादरम्यान रॅली काढून निषेध व्यक्त केला.

नागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी संघटनांनी या घटनेच्या विरोधात भारतासह जगातील २९ ठिकाणी आंदोलने केल्याने जागतिक स्तरावरही अवनीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले आहेत. 

अवनी या वाघिणीला मारण्यात आल्याने त्यावर राजकीय नेते आपली पोळी भाजत आहेत. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर आता जगातील वन्यपशुप्रेमी एकत्र आले असून त्यांनी अवनीची शिकार करण्याच्या प्रकारावर नापसंती व्यक्त केली आहे. या घटनेविरोधात  आज भारतासह जगात २९ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. परदेशात ११ शहरांमध्येही ‘जस्टिस फॉर अवनी’ या बॅनरसह पशुप्रेमी रस्त्यांवर उतरले होते. 
नागपुरात  महाराजबाग ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यासाठी शहरातील सर्वच पशुप्रेमी संघटना एकत्र आल्या होत्या. देशात ठिकठिकाणी मोर्चा, रॅलीची हाक देण्यात आल्यानंतर दिल्ली, मुंबई, चेन्नई, उदयपूर, कोलकता, सुरत, सवाई माधोपूर, त्रिवेंद्रम, बंगळूर, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, गोवा, विशाखापट्टणम, गुवाहाटी, कोईम्बतूर या शहरात आंदोलन करण्यात आले.

विदेशातही पडसाद
विदेशातही अवनीसाठी पशुप्रेमींनी निदर्शने केली. यात झगबर्ग (क्रोएशिया), डरबन (दक्षिण आफ्रिका), पर्थ (ऑस्ट्रेलिया), लॉस एंजेलिस व सॅन जोस कॅलिफोर्निया (यूएसए), न्यूयॉर्क (यूएसए), टोरंटो (कॅनडा), ख्राईस्टचर्च (न्यूझीलंड), काठमांडू (नेपाळ), ॲडमाँटन (कॅनडा) या शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर प्राण्यांना मारू नये, असा नियम आहे. मात्र, या घटनेत नियमाचे उल्लंघन झाले असा आरोप पीपल्स फॉर ॲनिमल्सच्या करिष्मा गालानी यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com