'अवनी'च्या मादी बछड्याला पकडले 

'अवनी'च्या मादी बछड्याला पकडले 

राळेगाव/वडकी (जि. यवतमाळ) : टी-वन वाघीण अर्थात अवनीला मारल्यानंतर तिच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली होती. त्यात वनविभागाच्या पथकाला शनिवारी दुपारी यश आले. हत्तीवर बसून पशुचिकित्सकाने मादी बछड्यावर डार्ट मारला अन्‌ त्यानंतर ही मोहीम अंजी परिसरात फत्ते झाली. 

अवनीच्या बछड्यांचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेशातून चार हत्ती याच आठवड्यात आणले होते. बछडे कॅमेऱ्यात ट्रॅप होत होते. मात्र, पथकाच्या हाती लागत नव्हते. बुधवार (ता.19) पासून अंजी परिसरात मोहीम अधिकच तीव्र करण्यात आली होती. कान्हा अभयारण्यातील शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय हे चार हत्ती आणि सहा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पथके या मोहिमेत सहभागी झाली होती. 

अवनीने राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्‍यातील 13 शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतला होता. अवनीला दोन ऑक्‍टोबरला बोराटी शिवारात ठार करण्यात आले होते. मात्र, तिचे दोन बछडे शिकारीयोग्य झाल्याने नागरिक भयभीत होते. अंजी परिसरात अवनीच्या एका बछड्याला जेरबंद करण्यात आले. यानंतर वनविभागाच्या वाहनाने त्याला तत्काळ पेंच अभयारण्यात हलविण्यात आले. 

हिरवी जाळी लावली होती 

बछड्यांना जेरबंद करण्यासाठी जंगल परिसरात हिरवी जाळी लावण्यात आली होती. जेरबंद करताना त्या बछड्याला सामोरचे काही दिसू नये, अशी खबरदारी घेण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com