रस्ते अपघातात दररोज 37 मृत्यू 

accident
accident

सोलापूर : राज्यात प्रत्येक वर्षात सरासरी 35 हजार रस्ते अपघात होतात. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज सुमारे 37 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस सूत्रांनी दिली. अपघात अन्‌ ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर खासदार, पालकमंत्री, आरटीओ, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्‍त, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामार्ग या अधिकाऱ्यांची रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. मात्र, वाढते अपघात अन्‌ मृत्यूची संख्या पाहता ही समिती नुसती कागदावरच कार्यरत असल्याचे दिसून येते. 

एकाच ठिकाणी सातत्याने अपघात होणारी ठिकाणे निश्‍चित करून ब्लॅक स्पॉट घोषित केला जातो. त्यानंतर तेथे ठोस उपाययोजना करून अपघात होऊ नयेत, असे नियोजन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यात 2016 मध्ये 742 ब्लॅक स्पॉट होते तर 2017 मध्ये 1275 आणि 2018 मध्ये 1324 ब्लॅक स्पॉट झाले. बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आरटीओ, वाहतूक पोलिस असो की महामार्ग विकास प्राधिकरण, यांच्याकडून काहीच ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. 

अपघाताची प्रमुख कारणे... 
- महामार्गाची संपूर्ण माहिती नसताना वेगात वाहन चालवणे 
- रस्त्यांलगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने 
- रस्त्यांवरचे मोठे खड्डे : खड्ड्यांना चुकविण्याचा प्रयत्न करणे 
- कोणतीही पूर्व कल्पना न देताच वाहन दुसऱ्या बाजूला नेणे 
- हेल्मेट अथवा सिटबेल्ट न घालताच वाहन चालवणे 

तीन वर्षांतील अपघात अन्‌ मृत्यूची स्थिती 
(2017) 
अपघात 
35,853 
मृत्यू 
13,364 
(2018) 
अपघात 
35,964 
मृत्यू 
13,185 
(2019) 
अपघात 
15,096 
मृत्यू 
4,234 

राज्यातील रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून सोलापूर रस्ते अपघातात टॉपटेनमध्ये आहे. प्रत्येक महिन्यात शहर-जिल्ह्यातील विविध महामार्गांवर सरासरी 137 जणांचा मृत्यू होतो. अपघात कमी करण्याच्या उद्देशाने सातत्याने कारवाई सुरू असते. परंतु, अपघात असो की ब्लॅक स्पॉट कमी झालेले नाहीत. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com