आज रविवार! मटण खाल्ल्यानंतर 'हे' खाणे टाळा

वृत्तसंस्था
रविवार, 14 जुलै 2019

आषाढ महिना सुरु असून, मटण खाणे हे खवय्यांसाठी सर्वांत पसंतीचे असते. मटणामुळे शरिरातील कॅल्शियम, लोह वाढते. पण, मटण खाल्यानंतर काही पदार्थ खाणे चुकीचे आहे. यामुळे आपल्या शरिराची मोठ्याप्रमाणात हानी होऊ शकते. 

पुणे : आषाढ महिना सुरु असून, मटण खाणे हे खवय्यांसाठी सर्वांत पसंतीचे असते. मटणामुळे शरिरातील कॅल्शियम, लोह वाढते. पण, मटण खाल्यानंतर काही पदार्थ खाणे चुकीचे आहे. यामुळे आपल्या शरिराची मोठ्याप्रमाणात हानी होऊ शकते. 

मटण खाल्यानंतर किंवा खाण्यापूर्वी कोणते पदार्थ खाऊ नये किंवा सेवन करू नये हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मटण खाल्यानंतर 'या' गोष्टी टाळाच
मध- मधामध्ये जे घटक असतात, त्यामुळे याचा थेट परिणाम हृदय आणि किडनीवर होतो. 

दूध- दूध किंवा दूधाचे पदार्थ मटण खाण्यापूर्वी किंवा मटण झाल्यानंतर अजिबात खाऊ नयेत. दुधात अँटि बायोटिक पदार्थ असतात, त्यामुळे त्याचा शरिरावर थेट परिमाण होता. कोड फुटणे असे रोग होऊ शकतात. दही हा याला पर्याय आहे. 

चहा- चहा पिल्याने गॅस, अॅसिडीटी होऊ शकते. त्यामुळे मटण खाल्यानंतर चहा अजिबात पिऊ नये.

सिगारेट सेवन- धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहेच. पण, जेवणानंतर लगेच सिगारेट सेवन करणे हे सर्वांत धोकादायक असते. 

लगेच झोपणे- मटण खाल्यानंतर आपण लगेच झोपणे अनेक रोगांना निमंत्रण आहे. मटणात तिखटाचे प्रमाण जास्त असल्याने पित्त व जळजळ ही लगेच सुरु होते. त्यामुळे हे टाळले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid eating 'this' after the meat