'उसाच्या को-238 वाणा'चे प्रलोभन टाळा

Avoid temptation of 'sugarcane-238 crops
Avoid temptation of 'sugarcane-238 crops

राहुरी : उसाचा को-238 हा वाण राज्यामध्ये चाचण्यांत नापास झालेला आहे. तरी सुद्धा हे वाण चांगले असल्याची आवई सोशल मीडियावर काहींनी उठविली आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसगत होत असून, त्यातून त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. हे वाण शेतकऱ्यांनी घेऊ नये, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ व पाडेगाव संशोधन केंद्राने केले आहे. 

राज्यात को-86032, को. एम. 1001 फुले 265, व्हीएसआय 800 या वाणाचीच लागवड केली जात आहे. यामुळे आपल्या राज्यात उत्पादन वाढलेले आहे. 'सोशल मिडीया'च्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. उत्तर भारतात को -238 हे वाण उत्पादनाला चांगले आहे. हे वाण देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू या राज्यांकरिता शिफारशीत केलेले आहे. एकरी दोनशे टन उत्पादन, सरासरी साखर उतारा वीस, लवकर व उंच वाढणारे हे वाण आहे. उत्तर भारतातील थंड हवामान व जमीन या वाणास मानवणारी आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये हवामान उष्ण असून, जमिनीतील फरक लक्षात घेता हे वाण राज्यातील ऊसउत्पादकांनी घेऊ नये, असे पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस पैदासकार डॉ. रामदास गारकर यांनी सांगितले. 

ऊस प्रजनन केंद्र कोइमतूर व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या मार्गदर्शनाखाली 'ज्ञानेश्वर'ने या वाणाची मल्टिलोकेशन चाचणी घेतली. त्यात हे वाण नापास झालेले आहे. आपल्याकडील हवामानात व जमिनीत हे वाण घेणे तोट्याचे ठरणारे आहे. 

- डॉ. रामदास गारकर, ऊसपैदासकार, ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव 

आपल्याकडे या वाणास आठ ते दहा महिन्यांतच तुरे येतात. अकरा महिन्यांत पूर्ण प्लॉटला तुरे येतात. उसाची जाडी मिळत नाही. तीव्र उन्हामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. फुलोऱ्यामुळे पुढे वाढ होत नाही. वजनही तितके मिळत नाही. केवळ सोशल मीडियातील प्रचारास शेतकऱ्यांनी बळी पडू नये. उसाच्या वाणाबाबत विद्यापीठाशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी.
 
- डॉ. आनंद सोळुंके, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com