गोरेवाड्यात वाघ, बिबट्यांना आयुर्वेदाची मात्रा

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाचा पुढाकार
Ayurveda for tigers and leopards in Gorewada Initiatives of zoo administration to boost immunity
Ayurveda for tigers and leopards in Gorewada Initiatives of zoo administration to boost immunitysakal

नागपूर : सध्या तापमान ४३ अंशाच्या जवळपास पोचले आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आणि वन्यप्राणी बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांना उकाड्याचा त्रास होऊ नये, उष्माघात अथवा अतिसाराच्या समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून प्रशासनाकडून वाघासह सर्वच वन्यप्राण्यांना आयुर्वेदिक औषधी आणि मल्टिव्हिटॅमिन्स दिल्या जात आहे. तसेच कुलर, वन्यप्राण्यांवर पाण्याचा फवारा आणि गरज असेल त्या परिसरात ग्रीन नेट लावल्या आहेत.

गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात एकूण नऊ वाघ, २४ बिबटे, सात अस्वले आणि शेकडो तृणभक्षक प्राणी आहेत. त्यांच्या पिजऱ्यांजवळ कूलर ठेवले असून ग्रीन नेट लावल्या आहेत. त्या परिसरातील मोकळ्या जागेत मोठी झाडे लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वन्यजीव बचाव केंद्रातील सात वाघ, १७ बिबट्यांसाठीही ग्रीन नेट आणि मुबलक पाणी देण्यावर भर दिला जात आहे. या वन्यप्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आयुर्वेदिक औषधे आणि मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाद्यान्नातून दिल्या जात आहेत. एवढेच नाही तर या प्राण्यांच्या पिंजऱ्यातही पाण्याचे मोठे टाके तयार करण्यात आले. वेळोवेळी या प्राण्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला आणखी कुलर लावण्याची गरज भासणार आहे.

वन्यप्राण्यांना जंगलाएवढा गारवा मिळावा यासाठी पिंजऱ्याच्या शेजारील मोकळ्या जागेत दहा ते बारा फुटांची झाडे लावण्यात येणार आहे. त्यांना नैसर्गिक वातावरण देण्यावर भर राहणार आहे.

प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कलूर, ग्रीन नेट आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वन्यप्राण्यांच्या तब्ब्येतीकडेही पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

-डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक, वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com