राज्यभरातील शाळांतून 'तंबाखू से आझादी' 

Azadi from Tobacco in schools across the state
Azadi from Tobacco in schools across the state

मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे संचालनालयातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. 

विद्यार्थी हा भविष्यात व्यसनमुक्त आणि आरोग्यसंपन्न राहावा, यासाठी शिक्षण विभाग महाराष्ट्र, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना, सलाम मुंबई फाउंडेशन, सकाळ माध्यम समूह, लायन्स क्‍लब, रोटरी क्‍लब आणि राज्यातील विविध संस्था "तंबाखूमुक्त शाळा' हे अभियान राबवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यातील शाळा तंबाखूमुक्त घोषित व्हाव्यात यासाठी या संस्था प्रयत्नशील आहेत. शिक्षण आणि आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन यांनी एकत्रितपणे यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांतील अनुक्रमे 2100 आणि 927 जिल्हा परिषद शाळा व्यसनमुक्त केल्या आहेत. 15 ऑगस्टला नंदुरबार हा तंबाखूमुक्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा जिल्हा घोषित होणार आहे. 
 
व्यसनमुक्ती ही आजच्या काळाची गरज आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखूमुक्त शाळा बनवण्याचे लक्ष्य आहे. 
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com